विजय यांचा धक्कादायक निर्णय! शिखरावर असताना का सोडला सिनेमा?

मुंबई: दक्षिण भारतातील सुपरस्टार ‘थलापती’ विजय यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा म्हणणार असल्याची घोषणा करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. करिअरच्या शिखरावर असताना हा निर्णय घेणाऱ्या विजय आता राजकारणात प्रवेश करणार आहेत.२७ डिसेंबरला मलेशियामध्ये त्यांच्या शेवटच्या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात विजय भावूक झाले. “हा वेदनादायक निरोप आहे,” असे ते म्हणाले. तीन दशकांच्या चमकदार कारकिर्दीनंतर ते आता ‘तमिळनाडू वेत्री कळघम’ (TVK) या स्वतःच्या राजकीय पक्षासोबत जनसेवेत उतरणार आहेत.”आता मी कॅमेरासमोर नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात असेन,” असे विजय यांनी जाहीर केले आहे. ‘घिल्ली’, ‘मर्सल’, ‘लिओ’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून त्यांनी फक्त मनोरंजनच नाही तर सामाजिक संदेश देखील दिले आहेत.त्यांचा शेवटचा चित्रपट ‘जन नायकन’ (Thalapathy 69) जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. एच. विनोथ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राजकीय आणि सामाजिक विषयावर आधारित असल्याची चर्चा आहे.विजय यांनी २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या पक्षाच्या पहिल्याच जाहीर सभेत लाखो लोकांची उपस्थिती त्यांची लोकप्रियता दर्शवते. ३२ वर्षांच्या कारकिर्दीत तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालेल्या विजय यांचा हा निर्णय सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का ठरला आहे. पण त्यांच्या मते, “चित्रपटात काम केले, आता जनसेवेची वेळ आली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *