Prabhas’s the Raja sahb प्रभासचा ‘द राजा साब’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!पहिल्याच तासाला 32 हजार तिकिटांची विक्री, सिक्वेलला हिरवा कंदील

2026 ची सुरुवात प्रभासने अक्षरशः ब्लॉकबस्टर स्टाईलमध्ये केली आहे. दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतलेला प्रभास आणि त्याचा नवा चित्रपट ‘द राजा साब’ सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. रिलीज होताच चित्रपटाने तुफान ओपनिंग घेतली असून, एका तासात तब्बल 32 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. एवढंच नाही तर, मेकर्सकडून सिक्वेल कन्फर्म झाल्याची माहितीही समोर आली आहे – म्हणजे गेम अजून सुरूच आहे!

हॉरर… कॉमेडी… प्रभास म्हणजेच परफेक्ट पॅकेज?

मारुती दिग्दर्शित द राजा साब हा एक मेगा बजेट, VFX-भरलेला हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. ‘बाहुबली’नंतर सतत मास अ‍ॅक्शन रोल्समध्ये दिसलेला प्रभास, तब्बल दशकानंतर पुन्हा फॅमिली एंटरटेनरमध्ये दिसत असल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आणि चाहत्यांच्या मते, हा आहे “व्हिंटेज प्रभासचा कमबॅक”.

हैदराबादमध्ये उभारलेली जगातील भव्य इनडोअर हवेली

या चित्रपटासाठी हैदराबादच्या बाहेरील भागात एक भलीमोठी हवेली सेट उभारण्यात आली आहे. हा सेट जगातील सर्वात मोठ्या इनडोअर सेट्सपैकी एक मानला जातो. म्हणजेच, स्क्रीनवर जे दिसतंय ते फक्त सिनेमा नाही, तर एक व्हिज्युअल फेस्ट आहे.

जागतिक रिलीज, सकाळपासून हाऊसफुल शो

द राजा साब ला तेलुगू, हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी अशा ७ भाषांमध्ये वर्ल्डवाईड रिलीज मिळालं आहे.हैदराबादच्या प्रसिद्ध संध्या थिएटरबाहेर सकाळपासूनच जल्लोषाचं वातावरण होतं. प्रभासचा भलामोठा कटआउट, फुलांच्या माळा, बॅनर्स, पोस्टर्स आणि खास टी-शर्ट घातलेले चाहते – सगळं दृश्य म्हणजे एखाद्या सणासारखं!

“₹500 ते ₹1000 कोटींची कमाई होण्याची शक्यता !” – चाहते उत्साहात

थिएटरबाहेर “प्रभास… प्रभास…” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शिट्ट्या, टाळ्या, जल्लोष – सगळीकडे एकच क्रेझ!

स्टारकास्टही तगडीच!

प्रभाससोबत या चित्रपटात संजय दत्त, बोमन इराणी, मालविका मोहनन, निधी अग्रवाल, रिद्धी कुमार आणि झरीना वहाब यांसारखे दमदार कलाकार आहेत.चित्रपटाची निर्मिती TG विश्व प्रसाद यांनी People Media Factory बॅनरखाली केली आहे. थोडक्यात सांगायचं तर…द राजा साब हा फक्त चित्रपट नाही, तो एक इव्हेंट आहे. प्रभासचा स्टारडम, वेगळी कथा, भव्य सेट्स आणि फॅमिली एंटरटेनमेंट – हे सगळं एका फ्रेममध्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *