
अमरावती, 24 डिसेंबर 2025 – अमरावती शहरात आज दिवसाढवळ्या धक्कादायक घटना घडली. तक्षशिला कॉलेजसमोर एका तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला करण्यात आला. पण अमरावती पोलिसांनी दाखवलेली तत्परता पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.
काय घडलं नेमकं?
आज मुददसर शहा नासीर शहा (रहिवासी फ्रेजरपुरा) हा युवक तक्षशिला कॉलेजसमोरून जात होता. तेवढ्यात काही अज्ञात जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला एवढा भयंकर होता की, पीडित युवकाचा जीव धोक्यात आला. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते.
फक्त 2 तासात पकडले आरोपींना!
अमरावती गुन्हे शाखेने या प्रकरणाची अत्यंत गंभीरपणे दखल घेतली. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि पथकाला तत्काळ सूचना दिल्या.गोपनीय माहिती मिळवून पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी सापळे रचले आणि अवघ्या दोन तासांत चार जणांना ताब्यात घेतलं!
कोण आहेत हे आरोपी?
पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे:
1. संकेत सुभाषराव ईरपुढे उर्फ येडा (वय 19, रा. फ्रेजरपुरा) 2. शुभम उर्फ शुभ्भु इंदोले (वय 21, रा. शाम नगर)
3. दोन विधीसंघर्षित बालकचौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
पोलीस यंत्रणेची कौतुकास्पद कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये दिपक सुंदरकर, जहीर शेख, संग्राम भोजने, अतुल संभे, सुरज चव्हाण, राजीव रायलीवाले, निखिल गेडाम आणि संदीप खंडारे यांचा समावेश होता.
