बीडमधील 11 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरण: बाळासाहेब आंबेडकर मैदानात, आयोगांमध्ये तक्रार दाखल करणार

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे.

पीडित कुटुंबाने बाळासाहेबांची घेतली भेट

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज फेसबुकवर एक महत्त्वाची पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, पीडित कुटुंबाने काल त्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

आरोपींकडून धमक्या, पोलीस तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न

या प्रकरणात आरोपींनी पीडित कुटुंबाला धमकावून पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला होता. बाळासाहेबांनी यावर तत्काळ प्रतिक्रिया देत डीवायएसपी पूजा पवार यांच्याशी संपर्क साधला. आरोपी कुंडलिक खांडे, गणेश खांडे यांच्यासह धमकी देणाऱ्या इतरांनाही सहआरोपी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

पोलीस संरक्षण द्या – वंचितची मागणी

पीडित कुटुंबाच्या सुरक्षेची चिंता व्यक्त करत बाळासाहेबांनी त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

न्याय मिळेपर्यंत लढा चालू राहील

वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली आहे. पीडितांना न्याय मिळेपर्यंत कायदेशीर लढा आणि सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन बाळासाहेबांनी दिले आहे.

तीन आयोगांमध्ये तक्रार दाखल होणार

वंचित बहुजन आघाडी आता या प्रकरणी तीन महत्त्वाच्या आयोगांमध्ये तक्रार दाखल करणार आहे:-

अनुसूचित जाती-जमाती आयोग

– राज्य महिला आयोग

– मानवाधिकार आयोग

या प्रकरणाचा पुढील घडामोड लक्षवेधी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *