स्थानिक कॉलेजसमोर सत्तूर घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या सापळ्यात, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ!

अमरावती: केशरबाई लाहोटी कॉलेज परिसरात मोठा धोका टळला! गाडगेनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॉलेज समोर घातक शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणास रंगेहाथ पकडलं आहे.

पोलिसांना मिळाली गुप्त माहिती

काल गुन्हे शाखेचे पथक गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत होते. तेवढ्यात त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली – केशरबाई लाहोटी कॉलेजसमोर एक तरुण हातात घातक शस्त्र घेऊन फिरतोय! या गंभीर माहितीनंतर पोलिसांनी एक मिनिटही वाया न घालवता तत्काळ सापळा रचला. आणि पाहता पाहता संशयित तरुणास ताब्यात घेतलं.

आरोपी कोण?

पोलिस तपासात समोर आलं की, या तरुणाचं नाव ऋषिकेश बाळू किर्दक (वय 24 वर्षे) असून तो मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे. सध्या तो रामपुरी कॅम्प, अमरावती येथे राहतो. त्याच्याकडून पोलिसांनी लोखंडी सत्तूर जप्त केलं आहे, ज्याची अंदाजे किंमत 1,000 रुपये आहे. पण प्रश्न पैशाचा नाही… प्रश्न सुरक्षेचा आहे! कॉलेज परिसरासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा घातक शस्त्रासह कोणी का फिरत होतं?

कायदेशीर कारवाई

या गंभीर प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध:कलम 4/25 आर्म्स ॅक्टकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदाया कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या त्वरित कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्यापूर्वीच आरोपीला अटक करण्यात आली. गाडगेनगर पोलीस गुन्हे शाखेची ही दक्षता कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *