
बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत आपल्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री खुशी मुखर्जीने अलीकडेच एक असा खुलासा केला आहे, जो सोशल मीडियावर वादळ घालून गेला आहे. टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव तिला सतत मेसेज करायचा, असा गौप्यस्फोट तिने केला आहे.
क्रिकेटर्स माझ्या मागे लागले होते – खुशी
ताज्या मुलाखतीत खुशी मुखर्जीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, “कित्येक क्रिकेटर्स माझ्या मागे लागलेले होते. सूर्यकुमार यादव तर मला सतत मेसेज करायचा. पण आता आमचं फारसं बोलणं होत नाही.”खुशीने स्पष्टपणे सांगितले की, तिला कोणत्याही लिंक-अपमध्ये किंवा अफवांमध्ये अडकायचे नाही. “मला त्याच्याशी जोडलं जायचं नाही. मला माझ्यासोबत कोणत्याही लिंक-अपमध्ये रस नाही. त्यामुळे खरं तर कोणताही लिंक-अप नाहीये,” असं तिनं स्पष्ट केलं.
सोशल मीडियावर चर्चांचा भडका
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण खुशीच्या या स्पष्टवक्तेपणाची कौतुक करत आहेत, तर काही जण या वक्तव्याला केवळ प्रसिद्धीसाठी केलेली चाल मानत आहेत.
कोण आहे खुशी मुखर्जी?
कोलकात्यातील खुशी मुखर्जीने 2013 मध्ये तमिळ चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने तेलुगू चित्रपट ‘डोंगा प्रेमा’ आणि ‘हार्ट अटॅक’ तसेच हिंदी चित्रपट ‘श्रृंगार’मध्ये काम केलं आहे.पण तिला खरी ओळख मिळाली ती टेलिव्हिजन रिअॅलिटी शोमधून. एमटीव्हीच्या ‘स्प्लिट्सव्हिला 10’ आणि ‘लव्ह स्कूल 3’ नंतर ती चर्चेत आली. ‘बालवीर रिटर्न्स’ आणि ‘कहत हनुमान जय श्री राम’ सारख्या टीव्ही शोमध्येही ती दिसली आहे.
बोल्ड इमेजची मालकीण
खुशी मुखर्जी सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोशूट्स आणि आगळ्यावेगळ्या फॅशन चॉईससाठी नेहमीच चर्चेत राहते. तिचे आऊटफिट्स अनेकदा व्हायरल होतात आणि वादग्रस्तही ठरतात.या प्रकरणावर सूर्यकुमार यादवने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सूर्यकुमार सध्या आपल्या क्रिकेट करिअरमध्ये उत्तम परफॉर्मन्स देत आहे आणि टीम इंडियाचा यशस्वी टी20 कर्णधार म्हणून आपली छाप सोडत आहे.
