
शहापूर तालुक्यातील एका लहानशा गावातून थेट सनरायझर्स हैदराबादच्या ड्रेसिंग रूमपर्यंत – हा आहे ओंकार तारमळेचा अविश्वसनीय प्रवास!
व्हिडिओ व्हायरल… वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वादळासारखा व्हायरल होतोय. त्यात एक वडील आपल्या खुर्चीतून उडी मारताहेत, हात जोडून देवाचे आभार मानताहेत… आणि डोळ्यात अश्रू! का? कारण त्यांच्या मुलाची आयपीएल मध्ये निवड झालेली आहे!पण हा फक्त एक साधा आनंद नाही… हा ३ लाख रुपयांच्या कर्जाचा, अनेक रात्री भुकेलेल्या पोटी झोपण्याचा, आणि “क्रिकेट सोडू का?” या विचारावर विजयाचा आनंद आहे !
सनरायझर्स हैदराबाद ने केली ३० लाखांची बोली… आणि शेरे गावात उडाला गजर!
१६ डिसेंबर २०२५ रोजी IPL मिनी ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील शेरे गावचा सुपुत्र ओंकार तारमळे याला ३० लाख रुपयांना विकत घेतलं! आणि त्या क्षणी… ओंकार मंदिरात होता, प्रार्थना करत होता वडील तुकाराम तारमळे टीव्हीसमोर होते, हृदय धडधडत होतं आणि संपूर्ण शेरे गाव रस्त्यांवर उतरलं, ढोल-नगाऱ्यांचा गजर सुरू झाला!
“३ लाख कर्ज घेतलं… पण हार मानली नाही!”
ओंकारचे वडील तुकाराम तारमळे यांचे शब्द ऐकलेत का? ते डोळ्यात पाणी आणतात…“आमची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मुलाला दिल्ली, त्रिपुरा अशा ठिकाणी खेळायला पाठवू शकू. पैसे नव्हते… पण मुलाचं स्वप्न होतं. म्हणून ३ लाख रुपये कर्ज काढलं. आज त्याची मेहनत रंगाला आली!”हे ऐकून डोळे पाणावतात ना? हीच आहे एका भारतीय बापाची खरी ताकद!
ग्रामीण भागातून IPL पर्यंत… किती अवघड असतं हे कोणालाच कळत नाही!
शहरातल्या मुलांना अकादमी, कोच, किट, प्रॅक्टिस ग्राउंड… सगळं मिळतं. पण ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंना? कच्च्या मैदानावर सराव . स्थानिक स्पर्धांमधून संधी शोधणं, पैशांच्या अभावी बाहेरगावी खेळायला जाण्यासाठी कर्ज घेणं .पण ओंकारने हार मानली नाही!
“क्रिकेट सोडायचा विचार केला होता…” – ओंकारचा खुलासा!
आणि आता सगळ्यात धक्कादायक गोष्ट ऐका…ओंकार स्वतःच म्हणतो –
“मी क्रिकेट सोडायचा विचारही केला होता. पण मनाने ठरवलं की स्वतःला एक शेवटची संधी द्यायची… आणि आज ते शक्य झालं!” म्हणजे काय… जर त्याने तो एक प्रयत्न सोडला असता तर?
आज ही कहाणी अस्तित्वात नसती! ओंकारचा संदेश सगळ्यांसाठी: स्वप्न मोठं ठेवा, मग तुम्ही कुठलाही गावातले असलात! ,कर्ज घेऊनही बाप तुमच्यासाठी लढतोय… तर तुम्ही का हार मानायची?एक शेवटची संधी स्वतःला द्या… कदाचित तीच तुमची IPL असेल!
शेरे गावचा लाडका आता ऑरेंज आर्मीचा योद्धा!
शहापूरचा नाद आता IPL मधून जगभर पोहोचणार आहे!
ओंकार तारमळे – हे नाव आता फक्त महाराष्ट्रात नाही… तर संपूर्ण देशात गाजणार आहे! शेअर करा ही प्रेरणादायी कहाणी! कारण प्रत्येक ग्रामीण मुलाला हे ऐकायला हवं – “तुझ्यातही एक IPL स्टार लपलेला आहे!”
