नागपूरचा प्रसिद्ध डॉली चहावाला सध्या सातव्या आसमानावर आहे. कारण आता तो चहाच्या टपरीवर सायकल, दुचाकी किंवा रिक्षाने नाही, तर थेट कोट्यवधींच्या Land Rover Defender मधून पोहोचतोय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर असा व्हायरल झालाय की लोक डोळे चोळून पाहत आहेत की हे खरंच घडतंय का?

बिल गेट्सपासून Defender पर्यंतचा प्रवास

डॉली चहावाला आता कोणत्याही ओळखीचा मोहताज राहिलेला नाही.बिल गेट्सला चहा पाजल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलून गेलं. आज तो मोठमोठ्या इन्फ्लुएन्सर्स आणि स्टार्सनाही लोकप्रियतेत टक्कर देतोय. अलीकडेच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत डॉलीचा रॉयल अंदाज पाहून अगदी शिकले-सवरले लोकही डोक्याला हात लावत आहेत.

Defender मधील एन्ट्री, पार्श्वसंगीत फिल्मी

हा व्हिडीओ डॉलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर @Dolly Ki Tapri Nagpur शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच डॉली Land Rover Defender मध्ये टशनात बसलेला दिसतो. बॅकग्राऊंडला वाजतंय रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील गाणं, जे सध्या बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालत आहे. 

गाडीतून उतरला, थेट चहा बनवायला

व्हिडीओमध्ये डॉली शाही थाटात गाडीतून उतरतो आणि सरळ आपल्या चहाच्या टपरीकडे जातो. महागड्या गाडीतून उतरल्यावर कोणताही आव नाही – तो पुन्हा आपल्या कामाला लागतो. स्टाईलमध्ये चहा बनवतो आणि ग्राहकांना सर्व्ह करतो.

म्हणजेच,

लक्झरी लाइफस्टाईल, पण मातीशी जोडलेलं काम!

आकडे ऐकूनच व्हायरल असल्याची खात्री

डॉली चहावाल्याचा हा व्हिडीओ आतापर्यंत

11.8 मिलियन (१ कोटींपेक्षा जास्त) विव्हस , 43 हजारांहून अधिक लाईक्स , 2 हजारांपेक्षा जास्त कंमेंट्स  मिळवून बसलाय. इंटरनेटवर हा व्हिडीओ अक्षरशः आगीसारखा पसरतोय.

नेटीझन्सचे भन्नाट रिअ‍ॅक्शन्स

व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर मजेशीर आणि धक्कादायक प्रतिक्रिया येत आहेत.

एका युजरने लिहिलं –

“आम्ही आमच्या डिग्र्या फेकून द्यायच्या का? इथे दिवस-रात्र अभ्यास करतोय आणि डॉली भाई Defender मधून फिरतोय!”*

दुसऱ्या युजरने म्हटलं –

“डॉली भाईने विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. महागड्या गाड्या फक्त CEO किंवा बिझनेसमनच चालवतात असं नाही, आता चहावालाही शक्य आहे.”*

आणखी एका कमेंटमध्ये लिहिलं होतं –

“यालाच म्हणतात खरी प्रगती. काम कुठलंच लहान नसतं, फक्त ते करण्याचा अंदाज मोठा असावा लागतो.”

सोशल मीडियाच्या युगातील यशाची नवी व्याख्या

डॉली चहावाल्याचा हा व्हिडीओ एक गोष्ट स्पष्ट करतो – आजच्या सोशल मीडिया युगात यश आणि प्रसिद्धी कुठूनही मिळू शकते. फक्त तुमचं काम वेगळं आणि अंदाज हटके असायला हवा.

चहाच्या टपरीवर Land Rover Defender मधून येणं ही फक्त एक व्हायरल क्लिप नाही, तर माइंडसेट बदलणारी गोष्ट आहे. डॉली चहावाला आज लाखो तरुणांसाठी प्रेरणा ठरतोय.

कारण शेवटी,

काम छोटं नसतं, स्वप्नं आणि स्वॅग मोठा असला की पुरे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *