अमरावतीत अचानक बदल! अवघ्या ८ महिन्यांत सीपी चावरियांची बदली, राकेश ओला नवे पोलीस आयुक्त

amravati breaking news

अमरावती – अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातून एक मोठी आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची अवघ्या आठ महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. ही बदली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाल्याने शहरात मोठी चर्चा सुरू आहे.

१३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार, बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त असलेले आयपीएस अधिकारी राकेश ओला यांची अमरावती शहर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू होण्याआधीच ही तडाखेबंद बदली झाल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अरविंद चावरिया यांनी केवळ आठ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला असतानाच त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर भर देण्यात आला होता. मात्र महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असतानाच त्यांची बदली झाल्याने हा निर्णय अधिकच महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, नवे पोलीस आयुक्त राकेश ओला हे अनुभवी आणि कडक प्रशासक म्हणून ओळखले जातात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली असून, अमरावतीत कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवणे आणि निवडणुका शांततेत पार पाडणे हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान असणार आहे.

आचारसंहिता लागण्याआधी झालेली ही बदली प्रशासनाच्या रणनीतीचा भाग आहे का? असा सवालही आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *