“बेंडोजी बाबांच्या समाधीसमोर भक्तांची गर्दी! यशोमती ठाकूरांसह दिग्गजांनी घेतले दर्शन”

घुईखेड: श्री संत बेंडोजी बाबा संस्थान, घुईखेड येथे सध्या सजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पावन प्रसंगी माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले.मंगळवारी काल्याच्या कीर्तनानंतर आयोजित धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिभावात पार पडला. यावेळी सर्व मान्यवरांनी विधिवत दर्शन घेऊन आरती केली आणि प्रसादाचा लाभ घेतला.या कार्यक्रमात माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्यासोबत वर्धा जिल्हा खा. बळवंतभाऊ वानखडे, खा. अमरभाऊ काळे, माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप आणि सुप्रसिद्ध सिने कलाकार भरतदादा गणेशपुरे यांनी उपस्थिती लावली होती.संस्थानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेला होता.माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी या कार्यक्रमाची माहिती त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *