
अमरावतीत ड्रग्सविरोधी मोहिमेला जबरदस्त ब्रेकथ्रू मिळाला आहे. शहर गुन्हे शाखेने थेट अॅक्शन मोडमध्ये जात एम.डी. ड्रग्स विक्री करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडत मोठी कामगिरी केली आहे.ही धडक कारवाई दि. 13 जानेवारी 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.कोर्टाजवळील पोस्ट ऑफिस परिसरात एम.डी. (Methadrone) ड्रग्सची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि आरोपीला थेट पकडले.
अटक करण्यात आलेला आरोपी
नाव: सलमान खा आमिर खा
वय: 24 वर्ष
राहणार: इंदिरा नगर, हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला
याच प्रकरणातील मुज्जु (राहणार – अमरावती) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
जप्त मुद्देमालाचा तपशील
एम.डी. ड्रग्स: 48 ग्रॅम 210 मिलीग्रॅम
किंमत: ₹ 4,49,210/-
मोबाईल फोन: ₹ 10,000/-
एकूण जप्त माल: ₹ 4,60,210/-
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही यशस्वी कारवाई माननीय पोलिस आयुक्त राकेश ओला,पोलिस उपायुक्त गणेश शिंदे,तसेच श्री शाम घुगे व रमेश धुमाळ (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली.ड्रग्समुक्त अमरावतीच्या दिशेने हे एक ठोस पाऊल मानले जात असून, गुन्हे शाखेचा हा झिरो टॉलरन्स अॅप्रोच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
