अमरावतीत अन्नकचरा व्यवस्थापनावर मोठी बैठक; आयुक्तांनी घेतले महत्त्वाचे निर्णय!

अमरावती – शहराला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने मोठी पावले उचलली आहे. अन्नकचरा, हॉटेल वेस्ट आणि बायोमेडिकल कचरा व्यवस्थापनावर आज एक महत्त्वाची संयुक्त बैठक घेण्यात आली. महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. यात कचऱ्याचे नियमित वर्गीकरण, अन्नकचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि गरजूंसाठी अन्न वितरणाच्या योजनेवर विशेष भर देण्यात आला. बैठकीत सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रुग्णालये आणि इतर संबंधित आस्थापनांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “शहर स्वच्छ, आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आणि शिस्तबद्ध ठेवायचे असेल तर सर्वांनी मिळून काम करावे लागेल,” असा संदेश आयुक्तांनी दिला आहे. या उपक्रमामुळे अमरावती शहराच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होणार असून, गरजूंना अन्न मिळवून देण्याचा समाजहितकारक उपक्रमही राबवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *